Ad will apear here
Next
निरोगी कसे रहावे, फेशियल
आजारी पडल्यावर काय करावे, असा विचार करण्यापेक्षा आजारी पडूच नये, यासाठी काय करावे, याचा विचार करायला हवा. निरोगी कसे राहावे, या प्रश्नाचे उत्तर वैद्य प्रसाद फाटक यांनी या पुस्तकातून दिले आहे. त्यासाठी प्रथम आपली प्रकृती ओळखावी, फिटनेस म्हणजे काय याची माहिती करून घ्यावी, स्वास्थ्य बिघडण्याची कारणे व उपाय शोधायला हवेत, प्रकृतीनुसार आहार-पथ्ये समजावून घ्यायला हवीत, असे ते विस्ताराने सांगतात. लठ्ठपणा कसा रोखावा, मानसिक संतुलन, व्यायाम आदींचाही ते विचार करतात.

‘फेशियल’ या पुस्तकात डॉ. छाया कुलकर्णी यांनी फेशियल्सच्या टिप्स दिल्या आहेत. फेशियलचे विविध प्रकार सांगितले आहेत. त्वचेनुसार फेशियल कसे करावे, याची कृती साहित्यासह सांगितली असून, त्यासाठी त्वचा कशी ओळखावी याविषयी मार्गदर्शन केले आहे.

प्रकाशक : साठे प्रकाशन
पाने : १७६
किंमत : १५० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZQYBI
Similar Posts
फेशियल + केसांची निगा व आयुर्वेदिक उपचार आपली त्वचा आणि केस वयाबरोबर आजारी पडतात, असे म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्वचेच्या किंवा केसांच्या वेगवेगळ्या समस्या उभ्या राहतात. त्वचेला सुरकुत्या पडतात आणि केस पांढरे होतात, गळू लागतात. अलीकडे अशा समस्या तरुण वयातही येताना दिसतात. मनीषा कोंडप यांनी त्यांच्या पुस्तकात केसांची निगा कशी राखावी, याविषयी मार्गदर्शन केले आहे
हीलिंग : एक प्रकाशवाट स्वास्थ्य राखण्यासाठी मन व शरीर दोन्ही तंदुरुस्त असावे लागते. आपल्याला होणारे बहुतांश रोग मनाचे स्वास्थ्य हरविल्यानेच होतात. म्हणूनच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी हीलिंग ही उपचारपद्धती उपयुक्त ठरते, असे विचार मांडून वृषाली लेले यांनी ‘हीलिंग : एक प्रकाशवाट’ या उपचारपद्धतीचे काम कसे
गुड बाय डायबेटीस + डाएट मंत्रा मधुमेह म्हणजेच डायबेटीस हा आजार अन्य व्याधींचे कारण बनू शकतो. त्यावर आयुष्यभर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. अशा मधुमेहासंदर्भात डॉ. कैलास कमोद यांनी ‘गुड बाय डायबेटीस’मधून जागृती केली आहे.
आरोग्य तुमच्या हातात - अर्थात रोगानुसार योगा आपल्या सर्वांकडे एक गोष्ट समान असते ती म्हणजे शरीर. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास आरोग्याच्या कुरबुरी सुरू होतात. हे टाळून निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग्य व्यायाम व आहार महत्त्वाचा ठरतो. या गोष्टींकडे लक्ष वेधत प्रा. दिनेश भालके यांनी ‘आरोग्य तुमच्या हातात अर्थात रोगानुसार योगा’मधून योगाभ्यासाविषयी मार्गदर्शन केले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language